राजकीय

भोर विधानसभेची लढत गाजणार ; जागा एक इच्छुक अनेक


भोर : महायुतीत भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्याकडूनही अनेकांनी भोर विधानसभा मतदार संघात निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवली आहे.त्यामुळे भोर विधानसभेमध्ये इच्छुकांची संख्या पाहता चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

भोर विधानसभा मतदार संघात सध्या काँग्रेसचे संग्राम थोपटे हे आमदार आहेत. त्यामुळे आघाडीत हा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला जाणार हे जवळपास निश्चित होते, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे पहावयास मिळत आहे, तर महायुतीत शिवसेना शिंदे गटाचे माजी पुणे जिल्हा परीषद सदस्य कुलदीप कोंडे, जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब चांदेरे हे इच्छुक आहेत, असं असलं तरी महायुतीत भाजपचे किरण दगडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे माजी पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी पुणे जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर अशा अनेकांनी या मतदार संघात निवडणूक लढण्याची तयारी केलेली आहे.

Advertisement

या मतदार संघात पुण्यातील शहरी भाग जोडला आहे. हिंजवडी आय टी पार्क आहे, हे पार्क 2800 एकरात असून हिंजवडी गुंतवणुकीचे केंद्र बनलेले आहे, तसेच लवासा प्रकल्प, गड किल्ले असा भौगोलिक दृष्ट्या मोठा मतदार संघ आहे, महायुतीत बंडाळी टाळण्यासाठीच उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत असल्याची माहिती मिळत आहे, मतदार संघ एक आणि इच्छुक अनेक अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे या मतदार संघात इच्छुक उमेदवारांकडून बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!