रामदास आठवले यांना सलग तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रीपदाची संधी.
खेडशिवापुर : दि. 9/06/24 (रविवार) नरेंद्र मोदी यांच्या सरकार मध्ये सलग तिसऱ्यांदा केंद्रिय मंत्रीपदाची संधी रामदास आठवले यांना मिळाली, त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (A) यांच्या पदाधिकारी यांनी एकच जल्लोष केला.
हवेली,भोर,राजगड(वेल्हा) या तालुक्यातील शेकडो आंबेडकर अनुयायी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रामदास आठवले यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेताच खेडशिवापूर येथे जाऊन फटाके फोडून लाडू वाटप केले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रवीण ओव्हाळ यांनी फोनवरून रामदास आठवले यांना शुभेच्छा दिल्या तसेच आलेल्या सर्व आंबेडकर अनुयायी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पार्टीचे आभार मानले,शेवटी फटाके फोडून लाडू वाटप करण्यात आले.




