6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईकरांना सुट्टी जाहीर
“सचिन साठे
प्रतिनिधी,दादर.
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो आंबेडकर अनुयायी दादर मधील चैत्यभूमी येथे येतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणुन मुंबई महानगरपालिका तसेच राज्य शासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई शहरातील शासकीय कार्यालय,महानगरपालिकेची कार्यालय, बॅंक,शाळा महाविद्यालय बंद राहणार आहेत.
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलेल्या सर्व सोयीसुविधाचा आढावा घेतला. हेलिकॉप्टरमधून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन करण्यात यावे, विविध रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष उभारण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
माजी उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, की दरवर्षी आपण चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. यावर्षीही सुद्धा कोणतीही कमतरता राहणार नाही, याची काळजी घ्यावी. सर्वानी समन्वयाने प्रयत्न करावेत. भोजन, आरोग्य, पाणी, स्वच्छता तसेच सुरक्षा आदी सुविधा दर्जेदार द्यावेत. स्थानिक समित्यांचे नेहमीच सहकार्य राहते. त्यांच्या सूचनांही योग्य प्रकारे अमंलात आणणव्यात. अनुयायी संवेदना व्यक्त करायला येतात. संवेदनशीलता ठेवून शासनाच्या माध्यमातून चांगल्या प्रकार नियोजन करावे, अशा सूचना देऊन फडणवीस यांनी यावेळी विविध सुविधांबाबतची माहिती घेतली आणि त्याबाबतच्या नियोजनाबाबत समाधानही व्यक्त केले.




