सामाजिक

सफाई कर्मचाऱ्यांना साहित्य पुरवण्यास पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष


­­संतोष अडसुळ                                           निगडी,पि.चिं.

निगडी : ओटास्किम से.नं. 22 ­या भागात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या गाड्यांना साधी चाकं व्यवस्थित नसतात तुटलेले-फुटलेले असतात, त्यामुळे या गाड्या ढकलताना महिला कर्मचाऱ्यांना खूप मेहनत घ्यावी लागत आहे, वारंवार सांगूनही वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास ­आले आहे.

पावसाळ्यात संसर्गजन्य रोगास प्रतिबंध करण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे, पावसामुळे स्वच्छतेत बाधा येऊ नये म्हणून घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांना पालिकेच्या वतीने रेनकोट, छत्र्या व हॅन्ड ग्लोज, गम बुट,कचरा गाडी, इत्यादी पुरविले जातात. यंदा मात्र पावसाळ्याला सुरुवात झाली तरी सफाई कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधा पुरविल्या जात नसल्याने त्यांना आपला जीव धोक्यात घालून काम करण्याची नामुष्की ओढवल्याने सफाई कर्मचारी वर्गात नाराजी पसरली आहे.

Advertisement

या सफाई कर्मचाऱ्यांच्या मार्फत शहरातील कचरा संकलन, रस्त्याची साफसफाई, छोटे नाले, गटारांची साफसफाई केली जाते, यामध्ये बदली, रोजंदारी, झाडूवाले, गटार बिगारी, तसेच पालिकेच्या कायमस्वरूपी सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांच्या कडून मिळाली आहे.

कचऱ्यात आणि घाणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सर्वस्वी जबाबदारी पालिका प्रशासनाची असते, त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी तोंडाला मास्क, घाणीने माखलेले हाथ धुण्यासाठी साबण, टॉवेल पुरविणे गरजेचे असते.

तरी वरील सर्व महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाकडून लवकरात लवकर योग्य ती साधन सामुग्री पुरवण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!