हळदी-कुंकू कार्यक्रमावर चोरट्यांची नजर ! दागिन्यांची काळजी घ्या !! पोलिस हवलदार प्रमिला निकम यांचे महिलांना आवाहन
नसरापूर : पुणे ग्रामीण पोलीस दलातील राजगड पोलीस ठाणे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. मकर संक्रांतानंतर ग्रामीण भागात हळदी-कुंकू कार्यक्रमांचे आयोजन वाढले आहे. या कार्यक्रमांना जाताना महिलांनी मौल्यवान दागिन्यांची विशेष काळजी घ्यावी, असा इशारा पोलिस हवालदार प्रमिला निकम यांनी दिला आहे.
राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिलांना संबोधित करताना प्रमिला निकम म्हणाल्या, “हळदी-कुंकू कार्यक्रम संध्याकाळी घरी भरविण्यात येतात. या वेळी चोरट्यांचा धोका वाढतो. त्यामुळे दागिन्याची काळजी घ्या किंवा सुरक्षितपणे जपून ठेवा. एकटे न जाता महिला ग्रुपमध्ये जा. मोटारसायकलवरून संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ राजगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
कापूरहोळ भागात गेल्या काही दिवसांत अशा चोरट्यांच्या घटनांची तक्रार राजगड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. बालाजी मंदिर,नारायणपूर देवदर्शनामुळे या भागात सतत भक्तांची गर्दी असते. चोरटे गर्दीचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी होत असतात, प्रमिला निकम पुढे म्हणाले की काही संशयित वर्तन आढळल्यास डायल १००/११२ किंवा ०२११३-२७२२३३ (राजगड पोलीस ठाणे) वर कॉल करा. माझ्या मोबाईल ९८८१३१६१९१ वर संपर्क साधावा असे यावेळी त्यांनी सांगितले.
पुणे ग्रामीण पोलीस प्रशासन व राजगड पोलीस ठाणे महिलांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे. या आवाहनामुळे ग्रामीण महिलांमध्ये जागरूकता वाढली आहे. सणानिमित्त पोलिसांचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. प्रमिला निकम यांच्या सक्रियतेमुळे स्थानिक महिलांना सुरक्षिततेचे चांगले मार्गदर्शन मिळाले आहे.




