ताज्या घडामोडी

वाकांबे गावच्या ग्रामदेवी जानुबईला नारळ फोडून प्रचाराचा भव्य शुभारंभ ! कोणीही सांगितले तरी माघार नाही : चंद्रकांत बाठें


संगमनेर : भोंगवाली-कामथडी जिल्हा परिषद गटातील मतदारसंघात चंद्रकांत बाठे माघार घेणार असल्याच्या अफवा विरोधक पसरवत असल्यानेच वाकांबे गावची ग्रामदेवी जानुबाईच्या समोर नारळ फोडून त्यांनी स्वतः च्या व पंचायत समितीचे उमेदवार अक्षयभैया सोनवणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. कोणीही सांगितले तरी मी माघार घेत नाही, फक्त तुम्ही पाठीशी रहा असे आव्हान यावेळी त्यांनी मतदारांना केले आहे.

चंद्रकांत बाठे यांनी त्यांचे समर्थक व मतदारांना दिलासा दिला.समोरच्या लोकांकडून मांडल्या जाणाऱ्या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून हा प्रचार प्रारंभ करण्यात आला. तीन दिवसांपूर्वी मतदारांनी बाठे यांना भावनिक साद घालत, “कोणत्याही परिस्थितीत तुम्ही निवडणूक लढा, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची अशी घोषणा दिली होती.

Advertisement

जिल्हा परिषदचे अपक्ष उमेदवार चंदकांत बाठे यांनी विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांना व तरुणांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देत असतात, कोणाला दवाखान्याची मदत, पैलवान किंवा इतर खेळाडूंना वैयक्तिक पाठबळ यामुळे त्यांचा याभागात प्रभाव आहे.गेल्या काळात त्यांनी सामाजिक कार्यातून अनेकांना आधार दिला असून, स्थानिक विकासासाठी योगदान दिले आहे.

पंचायत समितीचे अपक्ष उमेदवार अक्षयभैया सोनवणे यांनी पुर्व भागात अनेक विधायक कामे केली असुन महिलांना देव दर्शन, तरुणांसाठी कब्बडी व क्रिकेट स्पर्धाचे आयोजन केले होते, तसेच विविध विषयांकरिता जन आंदोलन केले आहे या कामाच्या जोरांवर ते लोकांना मतदानरुपी आशिर्वाद मागत आहेत.

या निवडणुकीत चंद्रकांत बाठे त्यांचा निर्धार पाहता, भोंगवाली-कामथडी मतदारसंघात जोरदार लढत होणार असल्याचे चित्र आहे. प्रचार यात्रेला ग्रामदेवीची कृपा लाभेल अशी ग्रामस्थांनी आशा व्यक्त करुन त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या, यावेळी ग्रामस्थांसह जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!