मुंबईहुन हैदराबादला निघालेले हेलिकॉप्टर पुण्यातील पौड येथे कोसळले
पुणे : जिल्ह्यातील पौड जवळ एक हेलिकॉप्टरची दुर्घटना झाली असुन ही घटना खराब हवामानामुळे घडली आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आज सकाळ पासुनच सतत पावसाचा जोर होता, यामध्ये 4 प्रवासी होते,हेलिकॉप्टर काही वेळ घोटावड्याच्या दिशेने आकाशात घिरट्या घालत असल्याचे स्थानिक सांगत होते. अचानक ते खाली पडल्याचा मोठा आवाज झाला, स्थानिक आणि आजुबाजूच्या लोक मदतीसाठी आले त्यांना नजीकच्या रुग्णालयांत उपचारासाठी पाठवण्यात आले,
हेलिकॉप्टरने मुंबईहून उड्डाण केलं होतं हे हेलिकॉप्टटर हैदराबादच्या दिशेने जात होत. दरम्यान पुणे जिल्ह्यातील पौड जवळ आल्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला असावा किंवा खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर थेट झाडाला धडकले त्यानंतर ते जमिनीवर कोसळलं.
पुण्याचे पोलीस आयुक्त पंकज देशमुख या दुर्घटनेची माहिती मिळताच ते ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले होत, हेलिकॉप्टर हे एका खाजगी कंपनीचे होते, AW139 मॉडेल अशी त्याची ओळख आहे,हेलिकॉप्टर दुर्घटना कशामुळे घडली असावी हे कारण सांगता येत नाही, त्यामधील सर्व प्रवास करणारे सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.




