ताज्या घडामोडी

महायुतीचा जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात पक्षपातीपणा : संग्राम थोपटे


पुणे : पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात व कामे मंजूर करण्यात पक्षपातीपणा होत असल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले.

भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांनी याबाबत बोलताना नियोजन समिती निधीच्या बाबतीत महायुतीचा हम करे सो कायदा आहे, मी म्हणेल तेच खरे अशा पद्धतीने पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये काम चालू आहे, या आधी विविध पत्राच्या रूपाने मागण्या करून त्यांनी कुठल्याही प्रकारच्या दुजाभाव न करता निकषाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासाला निधी उपलब्ध करून दिला जात होता, परंतु आत्ताचे सत्ताधारी लोकशाहीमध्ये एकाधिकारशाही करत आहेत, महाविकास आघाडीच्या एकाही आमदाराला एका रुपयाचाही निधी देण्यात आलेला नाही, दुर्गम आणि डोंगरी भागातील विकासाचा निधी मागितला असता तो उपलब्ध करून दिला नाही, खासदारकीला तुम्हाला कोणत्या मतदारसंघात किती मताधिक्य यावरून जर तुम्ही निधी वाटप करत आहात, जिल्हा नियोजन समिती निधीच्या बाबतीत पालकमंत्र्यांनी खरंतर दुज्याभाव करणे चुकीचे आहे, विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात विकासाला खोडा घालण्याची काम केले जात आहे, विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदार संघातील जनता ही महायुतीला महत्त्वाची वाटत नाही असेच म्हणावे लागेल, याचा जनता नक्कीचविचार करेल.

Advertisement

यावेळी आंदोलनात खासदार सुप्रियाताई सुळे, भोरचे आमदार संग्राम थोपटे, शिरूरचे आमदार अशोकबापू पवार, पुरंदरचे आमदार संजय जगताप, प्रशांत जगताप, जगन्नाथबापू शेवाळे, भारतीताई शेवाळे, स्वातीताई पोकळे, मृणालताई वाणी, स्वातीताई ढमाले, महादेव कोंढरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!