क्राईम

हातवे येथीलअपघात नसुन खुन ? : संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात


नसरापूर : हातवे, ता.भोर,दि. 22/09/24 (रविवार) रोजी झालेल्या घटनेतील गणपत खुटवड या व्यक्तीच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आले आहे, तीन दिवसापूर्वी झालेल्या खुन प्रकरणामुळे हातवे परिसरात गुढ निर्माण झाले होते, राजगड पोलीस प्रशासनाने अत्यंत हुशारीने केलेल्या तपासामुळे या खुन प्रकरणाचा तपास लागण्यात यश मिळाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हातवे येथील बंधाऱ्याजवळुन  घरी जात असताना होते, आरोपीने गणपत खुटवड यांच्यावर पाळत ठेवून हल्ला केला आरोपी व गणपत खुटवड यांची चालु काही घटनातुन व जुन्या वादाच्या रागातून स्वप्निल खुटवड ने गणपत खुटवड यांना अडवून मारहाण केली होती, त्यावेळी भुवईच्या वर आणि डोक्यात जखमा झाल्या होत्या, तसेच त्यांना नदी पात्रात ढकलून दिले, यामध्ये गणपत खुटवड गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

Advertisement

आरोपी व मयत यांचा वाद चालू असताना तेथून जाणाऱ्या स्वप्नील शेलार यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती, राजगड पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फरार झालेल्या स्वप्निल खुटवडचा शोध सुरू केला असता तो खेडशिवापूर येथे लपून बसल्याची माहिती मिळताच त्यास ताब्यात घेण्यात आले, या घटनेत आरोपी बरोबर अन्य कोणी साथीदार आहेत का आणि कोणत्या कारणामुळे आरोपीने खुन फोन आहे,याचा तपास सुरू आहे.

राजगड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उपनिरीक्षक अजित पाटील, उपनिरीक्षक संजय ढावरे, पोलीस हवालदार नाना मदने, मयूर निंबाळकर, अक्षय नलावडे, समीर भालेराव, सागर कोंढाळकर तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई करून आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळाले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!