ताज्या घडामोडी

मस्ती की डिजिटल पाठशाला ! सारोळा प्राथमिक शाळेत मिळणार डिजिटल शिक्षण


सारोळा : पुणे-बेंगलोर महामार्गावरील सारोळा,ता.भोर, जि.पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक डिजिटल शिक्षणाची सुविधा मिळावी यासाठी डिजिटल डेन पुणे व प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांच्या सहकार्याने व्हर्चुअल क्लास रूमची निर्मिती करण्यात आली आहे, यामुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्मार्ट शिक्षण मिळणार आहे.

माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे व भोर पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिता बाठे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी बोलताना स्मार्ट शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढेल व शिक्षणामध्ये क्रांतिकारी बद्दल घडल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास चंद्रकांत बाठे यांनी व्यक्त केला.

Advertisement

तसेच माजी सभापती सुनिता बाठे यांनी सांगितले की डिजिटल शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणाच्या दर्जा उंचावणार असून विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढणार आहे. आधुनिक आणि शैक्षणिक उपक्रम राज्यातील प्रत्येक शाळांनी राबवला तर शाळा बंद पडणार नाही. यावेळी सारोळा ग्रामस्थांकडून सुनिता बाठे यांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शाळेतील शिक्षक विजयकुमार थोपटे, चंद्रकांत जगताप, कांचन थोपटे, छाया हिंगे, वंदना कोरडे, संदीप सावंत, जयश्री शिर्के, अर्चना वरखडे, जया जाधव तसेच सरपंच रूपाली धाडवे, उपसरपंच झुंजार धाडवे यांच्यासह अनेक ग्रामस्थ, महिलाभगिनी व पालक उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!