ताज्या घडामोडी

मराठा ओबीसी वाद संपवायचा असेल तर ओबीसी मुलांची लग्न मराठा मुलींशी लावा लक्ष्मण हाकेंचे वादग्रस्त वक्तव्य


मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके करत असुन याच मागणीसाठी  लक्ष्मण हाके यांनी शिंगारवाडी फाटा, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथे सभा घेतली होती या सभेत बोलताना त्यांनी मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबाबत पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं या वक्तव्यानंतर लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून त्यांच्या विरोधात तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

मराठा आरक्षणासाठी जीआर काढल्यानंतर राज्यातलं वातावरण तापल आहे. ओबीसी संघटनांसह ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांनी प्रचंड विरोध केला आहे. या सगळ्या वादात आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी वेगळाच मुद्दा पुढे केला आहे. मराठा-ओबीसी वाद संपवायचा असेल, तर ओबीसी मुलांची लग्न मराठा मुलींशी लावा. तुम्ही आमच्यात आला आता जात संपली असून मी  ११ पोरं सुचवतो त्यांचं लग्नं जाहीर करा. असं लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना थेट चॅलेंज दिले होते.

मराठा समाजातील मुलींबद्दल अपशब्द वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मण हाके विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून, त्यांना बीड जिल्ह्यात फिरु न देण्याचा इशारा दिला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!