राजकीय

भोर नगरपालिकेसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद


 

भोर : भोर येथील नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भारतीय जनता पक्षाकडून संग्राम थोपटे यांच्या भोर येथील कार्यालयात संग्राम थोपटे, राजेंद्र शिळीमकर,  गिरीश जगताप, संतोष धावले, रवींद्र कंक, पल्लवी फडणवीस या मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. स्थानिक पातळीवर मोठ्या उत्साहाने या बैठकीस उपस्थित कार्यकर्त्यांनी उमेदवारी प्रक्रियेत भाग घेतला. या प्रक्रियेत उमेदवारांच्या कार्यकौशल्याचा तसेच त्यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाचा सखोल आढावा घेण्यात आला.भाजपमध्ये सुरू असलेली ही निवड प्रक्रिया पारदर्शक आणि कार्यकर्त्यांवर आधारित असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सर्वांना समान संधी दिली जात असून, प्रामाणिक कार्यकर्त्यांना प्राधान्य मिळावे अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पक्षातील वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी या उमेदवारांशी संवाद साधत असून, प्रत्येकाच्या मतांचा आदर केला जात असल्याचे उपस्थितांनी सांगितले.भोर, मुळशी आणि राजगड तालुक्यांमधील पंचायत समित्या व जिल्हा परिषदांच्या निवडणुका जवळ आल्याने स्थानिक राजकीय वातावरण तापले आहे.

Advertisement

केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरांवर भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे. गेल्या पाच वर्षांत भोर शहरात विकासकामांची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी झाली असल्याचे पक्षाचा दावा आहे. शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि आरोग्यविषयक योजनांमध्ये सातत्याने प्रगती झाल्याने नागरिकांचा विश्वास टिकून असल्याचे नेत्यांनी नमूद केले.

भाजप कार्यकर्त्यांमध्ये अशी भावना आहे की आगामी निवडणुकीत नगरसेवकांच्या 21 जागा तसेच नगराध्यक्ष पद पक्षाच्या उमेदवाराच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. अनेक इच्छुक उमेदवार शहराच्या विकासासाठी स्वतःला पात्र म्हणवून घेत आहेत. पक्षाच्या विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे मतदारांचा कल भाजपकडे राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात घेतले जाणारे निर्णय आणि प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीमुळे पक्षाच्या प्रशासनक्षमतेबद्दल मतदारांमध्ये सकारात्मकता वाढत आहे. ‘दिलेला शब्द पाळणारा पक्ष’ अशी प्रतिमा भाजपने दृढ केली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत पक्षाला भक्कम यश मिळेल, अशा आशावादाने भाजप कार्यकर्ते सज्ज आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!