ताज्या घडामोडी

पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ, वन्यप्राणी केंद्रात स्थलांतरीत करा : अजित पवार


पुणे : पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या संख्येत होणारी वाढ पाहता गुजरात मधील जामनगर येथील वनतारा या वन्य प्राण्यांची काळजी घेणाऱ्या प्रकल्पास किंवा अन्य कोणत्याही प्रकल्प केंद्रास बिबटे देण्यात यावे असे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

जुन्नर,आंबेगाव,शिरूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून बिबट्यांचे वास्तव्य असल्याने वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अनेक बिबटे पकडले गेले आहेत, तसेच भोर, वेल्हा, पुरंदर या तालुक्यातही बिबट्याचे सतत दर्शन होत आहे, पुणे जिल्ह्यात त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, नव्याने जन्म झालेले बछडे अन्न व पाण्याच्या शोधात थेट गावात, शहरात येत असुन, बिबट्या कुठल्याही वातावरणात स्वतःला सहज सामावून घेऊ शकतो, गावातील पाळीव कुत्रे जनावरे यांच्या रूपाने त्याला सहज खाद्य उपलब्ध होत असल्याने बिबट्याच्या मानवी वस्त्याजवळ जास्त वावर वाढलेला दिसुन येतो.

Advertisement

ऊस तोडणी करताना बऱ्याचदा ऊसाच्या फडात बिबट्यांचे लहान  लहान बछडे आढळतात, बिबट्यांच्या संख्येत दोन ते तीन पटीने वाढ झालेली दिसुन येते. बिबट्यामध्ये मोठ्या प्राण्यांची शिकार करण्याची क्षमता कमी असते, त्याची शिकार मानवी वस्तीमध्ये सापडतात, यामध्ये कुत्रे, बकरी, डुक्कर, मोकाट गुरे,कमी प्रतिकार क्षमता असलेले प्राणी हे त्याचे खाद्य असते. यातील दाट जंगलाची घटलेली संख्या तेथील लहान प्राण्यांचे  कमी झालेले अस्तित्व, आणि जंगलाच्या जवळ सरकलेली मानवी वस्ती या गोष्टीमुळे पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या वस्ती लगतचा वावर वाढला आहे,

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!