ताज्या घडामोडी

राजगड कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न, कितीही अडचणी आल्यातरी कारखाना सुरू करणारच : संग्राम थोपटे


कापूरहोळ : दि. 27/9/24 ( शुक्रवार) राजगडची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, सभेच्या सुरुवातीला अहवाल वर्षात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली, तसेच मागील सभेचे वृत्त व विषय पत्रिकेचे वाचन करून सभेच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली.

Advertisement

अध्यक्षीय भाषणात संग्राम थोपटेंनी महाराष्ट्रातील 13 आजारी कारखान्याना एनसीडीसीने कर्ज मंजुर केली होती, लोकसभा निवडणुकी नंतर कर्ज मंजूर झालेल्या दोन कारखान्याना कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात आली, त्यापैकी एक राजगड आहे,  काही सत्तेतील लोकांनी राजगडला आर्थिक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आम्हा संचालक मंडळांचा कायदेशीर लढा सुरू आहे, राजगड बाबत राजकारण करणाऱ्याचा निषेध करायला हवा, शेतकरी, कामगारांचे अशा अनेक जणांचे संसार वाऱ्यावर सोडणार नाही, चालु गळीत हंगाम 14 नोव्हेंबर पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सुरू करणार असून शेतकरी आणि कामगारांची देणी देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असुन लवकरच त्यांना दिली जातील.

याप्रसंगी व्हाईस चेअरमन पोपट सुके, उत्तम थोपटे, शिवाजी कोंडे, सुभाष कोंढाळकर, सुधीर खोपडे, विकास कोंडे, दिनकर धरपाळे, शोभा जाधव, सुरेखा निगडे, चंद्रकांत सागळे, अशोक शेलार, संदीप नगने, दत्तात्रय चव्हाण, प्रताप शिळीमकर, चंद्रकांत देवघरे, दत्तात्रय बाठे यांच्यासह सभासद, कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!