सामाजिक

भोर-पसुरे रस्त्याची दुरावस्था : वाहन चालकांची कसरत


सुनील सावंत.                                                           प्रतिनिधी, भोर

भोर : पुणे जिल्ह्यातील भोर-पसुरे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने स्थानिकांना खड्ड्यातून जीव घेणा प्रवास करावा लागत आहे, रस्त्याची काही ठिकाणी दुरावस्था निर्माण झाल्याने याचा नाहक त्रास वाहनचालक व प्रवास वर्गाला करावा लागत आहे. नागरिकांना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही, अंतर्गत रस्त्याची अक्षरशः चाळण झालेले आहे.

Advertisement

या खराब रस्त्यातला अतिवेगाच्या वाहनामुळे दिवसा-रात्री अंधारामध्ये लहान मोठे अपघात होत असल्याने हा रस्ता धोक्याची घंटा बनला आहे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे या रस्त्याच्या वरून आजूबाजूच्या गावातील नागरीक शाळकरी मुलांचे ही मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी जाणारे येणारे प्रवासी स्थानिक नागरिक करत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!