ताज्या घडामोडी

गणेशभैय्या खुटवड मित्र परिवारच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्नेह मेळावा संपन्न


नसरापूर : दि. ५ डिसेंबर (शुक्रवार) रोजी वेळू-नसरापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्ताने गणेशभैय्या खुटवड मित्र परिवाराच्या वतीने आयोजित स्नेह मेळावा नेहमीच्या अपेक्षेपेक्षा अधिक उत्साहाने पार पडला. या कार्यक्रमामध्ये स्थानिक नेते, सामाजिक कार्यकर्ते, युवक-युवती आणि जनतेच्या मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून आगामी निवडणुकीत सकारात्मक बदल घडवण्याचा सर्वत्र निर्धार व्यक्त केला .

स्नेह मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट संघटनाबळ वाढवणे, जनतेशी जाणिव व्यक्त करणे व आगामी निवडणुकांत यशोस्वी होण्याची रणनीती आखणे होते. या पार्श्वभूमीवर उपस्थितांना गणेशभैय्या खुटवड मित्र परिवारच्या नेतृत्वाखाली “चला बदल घडवूया, परिवर्तनाचे साक्षीदार होऊया” या घोषणे सादर करून निवडणुकीत सकारात्मक बदलांसाठी एकजुटीचा संदेश दिला गेला.

कार्यक्रमात बोलताना जिल्हा अध्यक्ष विजय कोलते यांनी सांगितले की, गाव-शहरातील सामाजिक, आर्थिक व विकासात्मक समस्यांवर चर्चा करणे व त्यासाठी योग्य मार्ग शोधणे आवश्यक आहे. यासाठी जनतेची मदत व सहकार्य घेऊन प्रत्येकाने आपल्या भागातील समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा निर्धार करावा असे आवाहन त्यांनी केले.

युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे यांनी संघटनांना विशेषतः जबाबदारीने पुढे येण्याचे आवाहन करताना त्यांनी म्हटले, तुमच्याच हाती या क्षेत्राचा विकास, पायाभूत सुविधा उभारणी आणि समाजातील बदल यासाठी आपली भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे. येणाऱ्या निवडणुकीत आपले मतदान केवळ अधिकार नव्हे तर जबाबदारी मानून सामाजिक बदलासाठी काम करणे गरजेचे आहे.

Advertisement

यावेळी उपस्थित प्रत्येक सदस्याने निवडणुकीत सक्रिय सहभाग वाढवण्याचे व सकारात्मक उमेदवारीस प्रोत्साहन देण्याचे ठरवले.या स्नेह मेळाव्यामुळे सामाजिक बांधिलकी व मतदारांमध्ये आपसी संवाद वाढण्यास मदत झाली असून आगामी निवडणुकीत परिवर्तन होईल.

या स्नेहमेळाव्यास पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष विजयदादा कोलते, युवक जिल्हाध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे, युवती जिल्हाध्यक्षा कु. दुर्गाताई चोरघे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी पक्षाचे भोर तालुकाध्यक्ष रविंद्रशेठ बांदल, ज्येष्ठ नेते व मा.उपसभापती मानसिंगबाबा धुमाळ, जिल्हा सरचिटणीस गणेशआण्णा बागल, तालुका कार्याध्यक्ष संदीपबापू नांगरे, भोर शहराध्यक्ष विठ्ठलजी शिंदे, युवती तालुकाध्यक्षा सौ.आरतीताई धावले, माऊली कोंडे, रूक्मिणी पवार या मान्यवार उपस्थीत होते.

तसेच वेळू-नसरापूर जिल्हा परिषद गटातील सर्व गावांचे आजी-माजी सरपंच-उपसरपंच, सदस्य, विविध विकास सोसायटींचे आजी-माजी चेअरमन-व्हा.चेअरमन, संचालक, ग्रामस्थ, पक्षाचे इतर पदाधिकारी व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेशभैय्या खुटवड यांनी केले व पारवडी गावचे सरपंच अमोल लिमण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर निलेश भोरडे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!