वीर धाराऊ माता जयंती उत्साहात साजरी ! शहीद जवान कै.अमर पवारांच्या मातोश्रीं धाराऊ माता मातृत्व पुरस्काराने सन्मानित
कापूरहोळ : दि. ३ जानेवारी २०२६ ( शनिवार) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या दूध आई वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा पौष पौर्णिमेला गावात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. वीर धाराऊ माता तरुण मंडळ व ट्रस्टच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात हुतात्मा अमर जवान कै. अमर शामराव पवार यांच्या मातोश्री सौ. सुरेखाताई शामराव पवार यांना ‘वीर धाराऊ माता गाडे पाटील मातृत्व पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. देशासाठी आपला पोटचा गोळा अर्पण करणाऱ्या या मातोश्रींना शतशः नमन करून हा पुरस्कार देण्यात आला आहे.
कार्यक्रम सकाळी १० वाजता वीर धाराऊ मातेच्या अभिषेकाने सुरू झाला. सायंकाळी ५ वाजता संपूर्ण गावात पालखी मिरवणूक काढण्यात आली, ज्यात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. मिरवणुकीनंतर आलेल्या मान्यवरांचे मनोगत व आभार प्रदर्शन माऊली बदक यांनी केले. त्यानंतर शिवव्याख्याते प्रतिक कालगुडे पाटील यांचे मार्मिक शिवव्याख्यान झाले, ज्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. व्याख्याना नंतर अतिथी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मा.आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी सौ. स्वरूपाताई थोपटे, नीताताई धनंजय इंगुळकर, रोहन बाठे, महेश टापरे, धनंजय इंगुळकर, अविनाश बाठे, हुतात्मा शहीद जवानांचे कुटुंब, विद्यमान सरपंच मंगलताई गाडे, उपसरपंच पंकज गाडे, अक्षय गाडे, अक्षय गाडे, सागर रा.गाडे, सागर स.गाडे, रामदास गाडे, मनीषाताई गाडे, सरिताताई गाडे, स्वातीताई गाडे, म्हस्कोबाराजे गाडे यांच्यासह उपस्थित सर्व महिला मंडळाने मान्यवरांचा सत्कार केला.
गावातील तरुण मंडळ व महिला मंडळाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.शेवटी हुतात्मा शहीद जवान अमर पवार यांच्या कुटुंबाने वीर धाराऊ माता गाडे पाटील परिवारास शहीद अमर जवानांच्या स्मारक उद्घाटनासाठी आमंत्रित केले.
यावेळी खंडू पांडू गाडे, रवींद्र गाडे, स्वप्निल गाडे, अजय गाडे, सूर्यकांत राजवडे, तुषार गाडे, वसंत सो.गाडे, वसंत म. गाडे, सुरज गाडे, ओमकार गाडे, वरून गाडे, नवनाथ महाराज गाडे, अजिंक्य महाराज गाडे, अक्षय चं. गाडे, अभिजीत जि. गाडे, अक्षय ज्ञा. गाडे, भोपाल गाडे, कुणाल दबडे, रोहित गाडे, अक्षय म. गाडे, ऋषिकेश म. गाडे, विकास रा. गाडे, राहुल गाडे, सुचिता गाडे, प्रीती गाडे, दुर्गा गाडे, प्राथमिक शाळेच्या शिक्षिका कुंभार मॅडम, गजानन गाडे, शंकर वीर पांडुरंग गाडे, गुलाब तात्या गाडे, लाठी काठीचे प्रशिक्षक ओमकार मांढरे व गावातील सर्व महिला-पुरुष मंडळी उपस्थित होते.




