ताज्या घडामोडी

गोल्डन व्हॉईसचा प्रथम वर्धापन दिन दिमाखात ! संगीतप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागाने रंगला सोहळा


भोर : भोर शहरातील संगीतप्रेमी कलाकारांना एकत्र आणून त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या भोर गोल्डन व्हॉईस या समूहाचा प्रथम वर्धापन दिन व नामकरण सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संगीत, कला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.

यावेळी ज्येष्ठ कलाकार राजेंद्र रोमन यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच कराओके गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपल्या सुरेल सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी डॉ. इब्राहिम खान यांच्या तर्फे रु. ५,०००, द्वितीय क्रमांकासाठी पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रविण जगदाळे यांच्या तर्फे रु. ३,०००, तर तृतीय क्रमांकासाठी राहुल कांंक यांच्या तर्फे रु. २,००० चे पारितोषिक देण्यात आले. जिद्द फाउंडेशनच्या अध्यक्षा कविताताई खोपडे यांच्या वतीने सर्व विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.

Advertisement

कार्यक्रमास डॉ. बुरांडे, डॉ. आगटे, राजू केळकर, भोर नगरपालिकेचे नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, उपनगराध्यक्षा जयश्री शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच आमदार संग्राम थोपटे, सर्व भाजप नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) चे नगरसेवक उपस्थित होते. विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांनी शुभेच्छा संदेश पाठविला.

अभिनेत्री वर्षा मुंबईकर यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. संगीत क्षेत्रातील कलाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी संस्थेच्या अध्यक्षपदी अनंत शिर्के यांची निवड जाहीर करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!