ताज्या घडामोडी

हिंजवडीत भीषण दुर्घटना ; ट्रॅव्हल्सला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू


वसंत मोरे,
प्रतिनिधी.

पुणे : हिंजवडी येथे आग लागून एक टेम्पो ट्रॅव्हल्स जळून खाक झाला असून त्यामध्ये चौघांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे 12 कर्मचारी या दुर्घटनाग्रस्त ट्रॅव्हल्स मधून प्रवास करत होते. आग लागल्यानंतर टेम्पोचं मागचं दरवाजा लॉक झाल्याने उघडू शकला नाही, ड्रायव्हर व काही कर्मचारी यांनी ट्रॅव्हल्स मधून उड्या घेऊन आपला जीव वाचवला तर चार कर्मचारी आतमध्येच अडकले आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला, आगीत काही जण जखमी झाले असून त्यांना  उपचारांसाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्दैवी अपघातामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे

Advertisement

हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत फेज 1 रोडवर, व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल MH14 CW 3548 बस ला अचानक आग लागली होती. आगीत टेम्पो मधील एकूण 12 प्रवासी पैकी 04 प्रवाश्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. व्योमा प्रिंटिंग प्रेसची बस तमन्ना सर्कल वरून रेजवानच्या दिशेने जात होती. अचानक बसला समोरून आग लागल्याने चालकाने उडी घेतली. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. बस मध्ये एकूण 15 जण होते. त्यात पुढे बसलेल्यांनी तत्काळ खाली उडी मारली आणि ते बचावले. मागच्या बाजूस बसलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो लॉक झाल्यानेचार कर्मचारी आगीत होरपळले आणि मृत पावले. ते चौघेही इंजिनिअर होते अशी माहिती समोर येत आहे, मृतामध्ये सुभाष भोसले, (वय 42), शंकर शिंदे (वय 60), गुरुदास लोकरे (वय 40) आणि राजू चव्हाण (वय 40) अशी नावे असून ते सर्व पुणे येथील रहिवासी आहेत, प्रवीण निकम, चंद्रकांत मलजीत, संदीप शिंदे, विश्वनाथ झोर, जनार्दन हंबारिडकर (टेम्पो चालक) अशी जखमींची नावे असुन जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!