भोरमध्ये आरपीआयचा भव्य मेळावा संप्पन ! आंबेडकर चळवळीतील युवकांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली
भोर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) भोर तालुक्याच्या वतीने आयोजित भव्य मेळावा व जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम उत्साहात पार पडला. गंगुताई वाचनालय हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमात अनेक युवकांनी पक्षात जाहीर प्रवेश करून संघटन बळकटीसाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमावेळी आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या आदेशानुसार पक्ष संघटन विस्ताराच्या दृष्टीने भोर तालुका अध्यक्ष सुनिल गायकवाड व युवक अध्यक्ष स्वप्निल सावंत यांच्या उपस्थितीत युवकांचा पक्ष प्रवेश व पद वाटप करण्यात आली.
अक्षय गायकवाड -भोर तालुका कार्याध्यक्ष
गणेश साळुंके -भोर तालुका संपर्क प्रमुख
अमोल भालेराव- भोर शहर अध्यक्ष
श्रीकांत जाधव-भोर तालुका उपाध्यक्ष
डॉ राजेश धिवार- भोर तालुका आर पी आय मुख्य प्रवर्तक
शंकर चौधरी -सह संपर्क प्रमुख
रंजीत रणखांबे -भोर तालुका उप कार्याध्यक्ष
नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निवडीचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
यावेळी भोर तालुका जिंगर ग्रुपच्या वतीने भीमगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमात सामाजिक न्याय, युवकांचे संघटन आणि पक्षाची आगामी वाटचाल यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमानंतर भोजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड, युवक अध्यक्ष स्वप्नील सावंत, गणेश साळुंके, अमोल भालेराव, श्रीकांत जाधव, डॉ. राजेश धिवार, शंकर चौधरी, रंजीत रणखांबे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




