शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची घोषणा : पुणे जिल्ह्यातील 5 शिक्षकांना पुरस्कार जाहीर
मुंबई : महाराष्ट्र शिक्षण विभागा मार्फत देण्यात येणारे शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्राप्त झालेल्या प्रस्तावांनुसार समिती मार्फत निवड करण्यात आली आहे. राज्य निवड समितीने शिक्षण मंडळास केलेल्या शिफारशीनुसार 110 शिक्षकांची निवड करण्यात आली, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातुन पात्र शिक्षकाची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात येते.
शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना आणि त्यांच्या अंगीकृत कामास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांचा योग्य सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1962-63 शिक्षक पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे, पूर्वीचे नाव आदर्श शिक्षक पुरस्कार होते, त्यात सुधारणा करत 2021-22 पासून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने योजना शिक्षण विभाग राबवत आहे.
पुरस्कार जाहीर झालेले पुणे जिल्ह्यातील शिक्षकांची नावांमध्ये
1) सचिन बेंडभर (सहाय्यक शिक्षक) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाबळेवाडी, ता. शिरूर.
2) पल्लवी शिरोडे (सहाय्यक शिक्षक) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोंढवे-धावडे, ता. हवेली
3) डॉ. सुनीता सपाटे (सहाय्यक शिक्षक) : भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे
4) रावसाहेब चौधरी (सहाय्यक शिक्षक) : अप्पासाहेब बांदल विद्यालय, आळंदे, ता. भोर
5) अलका उंडे (सहाय्यक शिक्षक) : जिल्हा परिषद शाळा, आमोंडी, ता. आंबेगाव या शिक्षकांना जाहीर झाला आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर हा जन्म दिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. जिल्ह्यातून 2024 च्या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांमधून प्रत्येक तालुक्यातून पात्र शिक्षकाची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. एका विशेष कार्यक्रमात सदरच्या पुरस्कारांचे वितरण विविध मान्यवरांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.




