शरद पवार यांचा वाढदिवस राजापुरच्या प्राथमिक शाळेमध्ये साजरा
भोर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस दि.१२ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत असतो, भोर तालुक्यातील पुणे जिल्हा परिषद शाळा राजापुर येथील विद्यार्थी व ग्रामस्थांनी सुद्धा शरद पवार यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा केला.
दरवर्षी प्रमाणे गावातील काही मंडळींनी प्राथमिक शाळेत जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांसोबत केक कापुन व शाळेमधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून शरद पवार यांचा वाढदिवस साजरा केला. आणि त्यांच्याबद्दल असलेले प्रेम व्यक्त करत वाढदिवसानिमित्त परमेश्वराकडे त्यांच्या दिर्घायुष्याची प्रार्थना केली.
यावेळी भरत बोबडे उपाध्यक्ष भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), सरपंच बाळासाहेब बोबडे,उपसरपंच सुरेश बागल, मा.चेअरमन ज्ञानेश्वर बोबडे, मा.सरपंच दिलीप बागल, दत्तात्रय बागल, गोविंद बोबडे,मां सरपंच रमेश बोबडे, सा.कार्यकर्ते चंद्रकांत बोबडे, मुख्याध्यापक अमोल निगडे गुरुजी व त्यांचे सर्व सहकारी तसेच शाळेतील अंगणवाडी ते इयत्ता ४ थी पर्यंतचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.




