सामाजिक

ऐतिहासिक रायरेश्वर किल्याहुन श्री दत्तगुरूच्या पादुकांचे नारायणपूरकडे प्रस्थान


भोर : श्री दत्तजयंती उत्सवासाठी भोर तालुक्यातील रायरेश्वर येथील पवित्र शिव मंदिरातील पादुका पायी दिंडीने दि.12/12/24 गुरुवारी श्री क्षेत्र नारायणपूर कडे प्रस्थान केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर पवित्र शिव मंदिर येथील पालख्यांचा समावेश प्रामुख्याने होता, सकाळी 10 वाजता पवित्र शंभू महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक, पूजन व आरती झाल्यानंतर दिंडीला सुरुवात झाली. सजावट केलेल्या पादुका घेऊन श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा असा जयघोष होऊन उत्साहात प्रस्थान संपन्न झाले.

Advertisement

रायरेश्वर पालखीचे यंदाचे 18 वे वर्ष आहे, भोर तालुक्यातील हिंदवी स्वराज्यातील निष्ठावंत सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज शिवभक्त नितीन जेधे यांच्या शुभहस्ते पूजन करून मोठ्या आनंदात भजन व दत्त नामाचा गजर करत दत्तभक्त सहभागी झाले,यावेळी जंगम ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उत्साहात सहभागी होऊन श्री गुरूदत्तांच्या नामाचा जयघोष करत पायी चालत होते . सायंकाळी भोर शहरात संत तेलीमहाराज कार्यालय येथे मुक्काम केल्यानंतर शुक्रवारी सकाळी पालखी श्री क्षेत्र नारायणपूर प्रवासास निघेल, सायंकाळी तेलवडी गावी मुक्काम असेल तसेच शनिवारी सकाळी पुन्हां नारायणपूरच्या दिशेने प्रस्थान केले जाईल व दुपारी 2 वाजेपर्यंत श्री दत्त जन्म सोहळ्याकरीता नारायणपूर येथे पोहचेल.

श्री दत्त जन्म सोहळ्याकरीता भोर तालुक्यातील पालख्या तसेच भक्तगण सहभागी होणार आहेत, याप्रसंगी सखाराम जंगम, नारायण जंगम,निलेश जंगम,मानतेश कोळी,संतोष मेढेकर, विनायक कंक,समीर घोडेकर,महेश शिर्के,विक्रम मालुसरे,वैभव खोपडे,सचिन चोरगे, दिनकर नवघणे, दत्तात्रय वाडकर,अजित तळेकर, राजू खोपडे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!