वंदे मातरम् च्या १५० व्या जयंती निमित्त भोर तालुक्यात विशेष कार्यक्रम
कापूरहोळ : भारतीय जनता पार्टी भोर तालुका, भोर शहर आणि केळवडे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने “संपूर्ण वंदे मातरम् गायन” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतमातेबद्दल अखंड श्रद्धा, देशभक्ती आणि एकात्मतेचा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे, हा भव्य उत्सव शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी दोन ठिकाणी पार पडणार आहे.
• पहिला कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता नायगाव येथील नव सह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन येथे होईल. विद्यार्थ्यांसह विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देणार आहेत.
• दुसरा कार्यक्रम सकाळी ११.०० वाजता केळवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आला आहे.
दोन्ही ठिकाणी देशभक्तीच्या वातावरणात प्रत्यक्ष उपस्थित राहून शेकडो नागरिक “वंदे मातरम्”चा स्वर एकत्र गुंजवणार आहेत.
या विशेष प्रसंगी भोर-राजगड-मुळशीचे माजी आमदार संग्राम दादा थोपटे, जिल्हा भाजपा सरचिटणीस बाळासाहेब गरुड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष जीवन आप्पा कोंडे, नवसह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव सुके तसेच भोर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भोर आणि राजगड तालुक्यातील सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा उत्सव म्हणून या “संपूर्ण वंदे मातरम् गायन” कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




