वेळू-नसरापूर जिल्हा परिषद गटामध्ये पोपट सुके यांना मतदारांची पहिली पसंती ! गावोगावी वाढता पाठिंबा
नसरापूर : वेळू-नसरापूर जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पोपट सुके यांना सर्वसामान्य नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. नव सह्याद्री कॉलेजच्या माध्यमातून तसेच स्थानिक पातळीवर विविध विकासकामे, सामाजिक उपक्रम, नागरिकांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.
विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला व युवकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न पोपट सुके सातत्याने करत असल्याचे वेळू-नसरापूर जिल्हा परिषद गटातील नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, शेतीपूरक उपाययोजना तसेच विकासाभिमुख कामांच्या आश्वासनामुळे अनेक नागरिक त्यांना पहिली पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.
कामथडी-भोंगवली जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, महेश टापरे यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक पातळीवर “सर्वसामान्यांचा नेता” अशी ओळख निर्माण झाल्याने त्यांच्या उमेदवारीकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.




