राजकीय

नसरापूर पंचायत समिती गणात ट्विस्ट ! शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीसाठी सूरज (बंटी) जगताप इच्छुक


 

नसरापूर : युवाशक्तीचा आवाज म्हणून ओळखले जाणारे सूरज (बंटी) हनुमंत जगताप हे भोर-वेल्हा परिसरातील सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व आहे. सुप्रसिद्ध निवेदक, समाजसेवक आणि युवासेना संघटक म्हणून त्यांनी गेल्या काही वर्षांत प्रभावी कामगिरी केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव, सामाजिक उपक्रम, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून त्यांनी सातत्याने समाजाला दिशा दिली आहे.

ग्रामविकास आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधत त्यांनी पीएमआरडीए घरकुल योजनेंतर्गत गावातील अपूर्ण कामांकडे लक्ष वेधले असून, स्थानिक विकासकामे मार्गी लावण्यासाठी सक्रीय प्रयत्न सुरू ठेवले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप उपक्रमांमधून त्यांनी शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण केली आहे.

Advertisement

कोरोना काळात ग्रामदूत म्हणून कार्य करत त्यांनी आरोग्य, स्वच्छता आणि जनजागृती या माध्यमातून समाजात आदर्श निर्माण केला. संकटातही समाजाशी जोडून सेवा देणारा युवा चेहरा म्हणून त्यांची ओळख अधिक बळकट झाली आहे.आता नसरापूर गणातून शिवसेना (शिंदे गट) उमेदवारीसाठी सूरज (बंटी) जगताप यांनी स्वराज महाराष्ट्र न्यूजशी बोलताना आपली इच्छा व्यक्त केली आहे.

आपल्या संघटनात्मक ताकदी बरोबरच तरुणाईचा जोश आणि सामाजिक बांधिलकी यांच्या जोरावर ते आगामी निवडणुकीत नवा उत्साह निर्माण करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निरंतर जनसंपर्क, सेवाभाव आणि विकासाभिमुख दृष्टी या त्रिसूत्रीच्या आधारे सूरज (बंटी) जगताप हे युवा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!