ताज्या घडामोडी

कापूरहोळ येथील साई स्पर्श गृहनिर्माण संस्थेची निवडणूक बिनविरोध ! चेअरमनपदी गणेश खाटपे तर व्हाईस चेअरमनपदी राज गाडे यांची निवड


कापूरहोळ : भोर तालुक्यातील कापूरहोळ येथील साई स्पर्श गृहनिर्माण संस्था सार्वत्रिक निवडणूक २०२६ नुकतीच उत्साहपूर्ण आणि सलोख्याच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. सर्व पदांसाठी एकमताने निवड झाल्याने संस्थेतील एकोपा आणि परस्पर सहकार्याचे दर्शन घडले. नव्याने निवड झालेल्या कार्यकारिणीवर संस्थेच्या विकासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या निवडणुकीत गणेश मारुती खाटपे यांची चेअरमनपदी, राज विजय गाडे यांची व्हा. चेअरमनपदी, विक्रम मच्छिंद्रनाथ जगताप यांची सचिवपदी, तर वर्षा सचिन चव्हाण यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच अश्विनी पांगारे, शाकीर शेख आणि संगीता पुरोहित यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

Advertisement

निवड जाहीर होताच सभासदांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व लोकाभिमुख कारभार राबविण्याचा निर्धार नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला. सभासदांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, संस्थेच्या परिसराचा विकास करणे तसेच सभासदांच्या हिताला प्राधान्य देणे यावर भर दिला जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

संस्थेतील ऐक्य, विश्वास आणि सहकार्याच्या भावनेमुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे सभासदांनी नमूद केले. आगामी काळात विविध विकासकामांना गती देऊन संस्थेची प्रगती अधिक वेगाने साध्य करण्याचा विश्वास नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!