पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती प्रक्रिया सुरू ; ऑगस्ट २०२१ मध्ये अर्ज करणारे निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र
किशोर देशपांडे,
पुणे.
पुणे : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा सहकारी बँकेचा कारभार सुरू आहे. एक प्रकारे जिल्हा सहकारी बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (AP) चे नेतृत्व आहे. बँकेने ४ वर्षापूर्वी म्हणजे ऑगस्ट २०२१ मध्ये ३५६ लिपिक पदाकरीता भरती प्रक्रिया सुरु केली होती, पदासाठी ऑनलाइन अर्ज मागविले होते त्यावेळी ३५६ जागे करिता जवळ-जवळ ३२ हजाराहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु सहकार विभागाने बँकेला शासनाने नियुक्त केलेल्या पॅनल वरील संस्थे मार्फतच भरती प्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या असल्याने भरती प्रक्रिया रखडली होती.
विद्यमान संचालक मंडळांनी एका विशिष्ट संस्थेमार्फतच भरती प्रक्रिया राबवण्याच्या हट्ट धरला होता, तब्बल ४ वर्षानंतर सहकार विभागाच्या मार्गदर्शनाखाली बँकेने आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे ठरवले आहे, ज्या उमेदवारांनी ऑगस्ट २०२१ मध्ये अर्ज केलेले असतील तेच या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात, ही संपूर्ण भरती प्रक्रिया ४ वर्षापूर्वी ज्या टप्प्यावर रखडली होती तेथूनच सुरू होईल असे सांगण्यात आले आहे.
भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यामुळे वाट पाहणाऱ्या उमेदवारांना काहीसा दिलासा मिळालेला आहे, भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अपडेटसाठी उमेदवारांनी बँकेच्या वेबसाईटला भेट द्यावी असे सांगण्यात आले आहे, या भरती मध्ये ३५६ क्लार्कची पदे भरण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे. भरती प्रक्रियेसंबंधीचे निवेदन बँकेने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले असून बँकेच्या संकेतस्थळाला भेट देऊन उमेदवारांनी अधिक माहिती घ्यावी असे आव्हान कऱण्यात आले आहे.




