ताज्या घडामोडी

राजगड व तोरणा किल्ल्यावर शिवस्मारक उभारणीसाठी परवानगी द्या : रोहिदासबापु चोरघे


राजगड : महाराष्ट्राच्या अभिमानास्पद इतिहासाचे प्रतीक असलेले राजगड-तोरणा हे किल्ले असंख्य शिवप्रेमींसाठी प्रेरणास्थान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील महत्वाचे टप्पे या किल्ल्यांशी संबंधित आहेत. याच इतिहासाचे स्मरण व्हावे आणि युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, इतिहासप्रेम आणि स्वाभिमान यांचे बाळकडू निर्माण व्हावे या उद्देशाने या किल्ल्यांवर शिवस्मारके उभारण्यात यावीत, अशी मागणी शिवप्रेमींच्या वतीने रोहिदासबापू चोरघे यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिवप्रेमींच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आमचा उद्देश गडाचे मूळ ऐतिहासिक रचनावैभव अबाधित ठेवत पर्यावरणस्नेही व ऐतिहासिक साक्षांवर आधारित स्मारके उभारण्याचा आहे. स्मारकामुळे गडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल व स्थानिक पर्यटन व्यवसायालाही चालना मिळेल.”

Advertisement

यावेळी रोहिदास चोरघे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “राजगडावर शिवस्मारक उभारणीसाठी आम्ही संविधानिक मार्गाने परवानगी घेणार आहोत. मात्र, अलीकडेच काही शिवभक्तांनी भावनेच्या भरात विनापरवाना पुतळा बसवला होता. या प्रकरणी प्रशासनाने गुन्हे दाखल केले असून, ते मागे घ्यावेत अशी आमची ठाम मागणी आहे.”प्रशासनाने शिवप्रेमींच्या या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर परवानगी द्यावी, तसेच आधी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी नम्र विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सदर मागणीसाठी तहसीलदार राजगड (वेल्हे) तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक वेल्हे पोलीस स्टेशन यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून, यास शासकीय पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा सर्व शिवप्रेमी व्यक्त करत आहेत.

यावेळी युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास बापू चोरघे, उपाध्यक्ष सचिन ढोरे, कातवडीचे माजी सरपंच शरद पिलाने, मनसे तालुकाप्रमुख दिगंबर चोरघे, गोपाळ इंगुळकर, एकनाथ वालगुडे, शैलेश वालगुडे, सागर मोझर, कुंदन गंगावणे, चंद्रकांत मोरे, खंडू गायकवाड, अंनता उफाळे, भगवान खुटवड, विठ्ठल वालगुडे, विशाल वालगुडे, दत्ता पानसरे, निलेश पवार, नाना शिर्के आदी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!