मालवाहतुक गाडी भाडेकराराने घेतली, पैसे मागितल्यामुळे गाडीच लपवुन ठेवली
किकवी :वाघजवाडी, ता.भोर येथील युवक परिष अरविंद जाधव यांच्या झालेल्या फसवणुकी संबंधीत 29/05/2024 रोजी दुपारी 12.25 वाजता किकवी पोलीस चौकीमध्ये दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दिनांक 15/06/2023 रोजी दुपारी 02.00 वा चे सुमारास कापूरव्होळ येथील चौकात युवकाची पिकअप गाडी नं. MH-12 E 4830 जितेंद्र कुंभार व त्याचा मुलगा राहूल कुंभार यांचे ताब्यात दिली होती. त्यानंतर दिनांक 01/12/2023 रोजी जितेंद्र कुंभार यांचा मुलगा राहूल जितेंद्र कुंभार रा नायगाव ता भोर जि पुणे याच्या बरोबर पिकअप गाडी हिचा भाडे करार केला त्या करारा मध्ये दर महिना रक्कम रूपये 25,000/- रू देण्याचे ठरले परंतू 4 महिने झाले तरी जितेंद्र कुंभार व त्यांचा मुलगा राहूल कुंभार यांचेकडे गाडी भाडयाचे पैसे मागितले असता ते पैसे देण्यास टाळा-टाळ करू लागले,आज पैसे देतो उदया पैसे देतो असे म्हणून वेळ मारून नेत होते. त्यावेळी युवकाच्या वडीलांनी जितेंद्र कुंभार आम्हाला आमची गाडी परत दया असे सांगितले, आरोपी बोलले तुमची गाडी परत देतो म्हणून परंतु आज पर्यंत त्यांनी पिकअप गाडी व तिचे भाड्याचे पैसे आज रोजी 11 महिन्याचे 25,000/- प्रमाणे येणे बाकी आहेत.त्यांची पैसे व गाडी देण्याची मानसिकता नसल्यामुळे आज युवक परिष अरविंद जाधव यांनी जितेंद्र पांडुरंग कुभार व त्यांचा मुलगा राहूल जितेंद्र कुंभार रा नायगाव, ता भोर, जि पुणे यांच्या विरुध्द पिकअप गाडी लपवुन ठेवणे, आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी त्या दोघांच्या विरूध्द कायदेशिर गुन्हा दाखल केला आहे,
आधीकचा तपास पोलीस निरिक्षक गवळी यांच्या मार्गदर्शना खाली पो.ना.सुर्यवंशी ,तपासी अमंलदार – पो.हवा चव्हाण हे करत आहेत.




