ताज्या घडामोडी

भोर तालुक्यात शशिकांत शिंदे यांचे जल्लोषात स्वागत ! कापूरहोळ मध्ये फटाक्यांची आतिषबाजी


वसंत मोरे,
प्रतिनिधी.

कापूरहोळ : नवनिर्वाचित शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे कापूरहोळ येथे दि.१९ जुलै २०२५ (शनिवार) रोजी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. भोर तालुक्यातील चारही जिल्हा परिषद व जय समितीसाठी इच्छुक असणारे उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याच बरोबर भला मोठा पुष्पहार क्रेनच्या सहाय्याने शशिकांत शिंदे यांना घालण्यात आला.

Advertisement

शशिकांत शिंदे यांची अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी त्यांची मदत होणार आहे. या निवडीबद्दल भोर तालुक्यातील शरद पवारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.

नियुक्तीबद्दल पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बागल, भोर तालुका अध्यक्ष रविंद्र बांदल, युवक अध्यक्ष गणेश खुटवड, कापूरहोळचे उयोजक आनंद दळवी, उद्योजक दिपक उकिरंडे, बाळासाहेब फरताडे, समीर गाडे, प्रतीक गाडे, अमित गाडे, पोपट चौधरी, भरत बोबडे तसेच भोर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे कौतुक होत आहे.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!