प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त शरद पवारांसह इतर मान्यवरांकडुन अभिवादन
राजेंद्र खरात,
सातारा प्रतिनिधी.
कराड : 25 नोव्हेंबर 2024 संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज 40 वा स्मृतिदिन या निमित्त शरद पवार यांनी आज सकाळीच कराड मध्ये प्रितीसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
एक मे 1960 रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली होती, त्यांनी देशाचे उपपंतप्रधान पदही भूषवले होते, पेशाने ते वकील होते महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना वेगळेच स्थान होते, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून यशवंतराव चव्हाण यांचा नावलौकीक आहे, यशवंतराव चव्हाण यांना साहित्याची आवड होती, त्यांच्या आधुनिक विचारांनी महाराष्ट्राची पाया भरणी करणारे महाराष्ट्राला कृषी क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात अग्रेसर बनवण्यात योगदान देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव साहेब यांच्या बद्दल गौरव उद्गार शरद पवार यांनी काढले.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे, रोहित पवार, निलेश लंके, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, विकास लवांडे यांच्यासह स्थानिक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संखेने शरद पवार यांच्या बरोबर उपस्थित होते.




