क्राईम

पुण्यामध्ये १९ वर्षीय विद्यार्थिनीकडून इंस्टाग्रामवर पाकिस्तान जिंदाबादची कमेंट : कोंढवा पोलिसांकडून अटक


अरविंद पाटील,
कोंढवा.

पुणे : पुणे शहर पोलिसांनी एका १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थीनीला इंस्टाग्राम वरील पोस्ट करिता अटक केली असुन इंस्टाग्राम वरील पोस्टमध्ये विद्यार्थिनींनी पाकिस्तान जिंदाबाद अशी कमेंट केली होती, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थीनीला अटक करून तिच्यावर भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम १५२, १९६, १९७, २९९, ३५२, ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांकडून मोठ्या प्रमाणात खोट्या बातम्या परसरवल्या जात आहेत. तणावाच्या काळात खोटी माहिती पसरू नये या पार्श्वभूमीवर सरकारकडून काही उपाय योजना केल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून सरकारकडून नागरिकांना फेक न्यूज बद्दल जागृत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकारडून अशा ‘फेक न्यूज’बद्दल तक्रार करण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक आणि इमेल आयडी देण्यात आला आहे.

भारतीय लष्कराने पाकिस्तान विरोधात सशस्त्र कारवाई सुरू केल्यानंतर पोलिसांकडून सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यात येत असुन पोलिसांना या विद्यार्थिनींची आक्षेपार्ह कमेंट आढळून आल्याने पोलिसांनी कोंढवा परिसरातील कौसरबाग येथे राहत असलेल्या १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थीनीला अटक केली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सकल हिंदू समाजाकडून करण्यात येत आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!