पुण्यातील कोंढवा परिसरात ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार : आरोपींकडून पीडित मुलीस जीवे मारण्याची धमकी
ईकबाल मुलाणी,
कोंढवा.
कोंढवा : पुण्यातील कोंढवा परिसरात अल्पवयीन पीडित मुलगी आणि आरोपी साहिल अन्वर शेख हा शेजारी राहत असुन ही घटना ३ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित चिमुरडी रात्री १० वाजण्याच्या सुमारास स्वच्छतागृहात गेली असता यावेळी तिच्यावर पाळत ठेऊन बसलेल्या आरोपीने तिच्या मागोमाग जाऊन जबरदस्ती स्वच्छतागृहात शिरला. त्यानंतर त्याने दरवाजा लावून घेतला व तिला धमकावत तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला, आणि घडलेला प्रकार कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने पीडित मुलीस दिली.
मुलगी घरी गेल्यानंतर काही वेळाने तिचे पोट दुखू लागल्याने पीडित मुलीने तिच्या आईला घडलेली संपुर्ण घटना सांगितली, त्यानंतर पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असुन याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक थोरात करत आहेत.




