ताज्या घडामोडी

२१ मेला रस्त्यावर एकही रिक्षा-टॅक्सी धावणार नाही : महाराष्ट्र ऑटो रिक्षा मालक-चालक संघटनेची राज्यव्यापी बंदची हाक


मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यात ई-बाईक टॅक्सीला दिलेली मंजूरी तातडीने रद्द करण्यात यावी, याकरिता दि. २१ मे २०२५ रोजी महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्रच्या सर्व संलग्नीत संघटनांद्वारे महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयासमोर निदर्शने केली जातील. असे ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समीतीने त्यांच्या पत्रात म्हंटले आहे. बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली महाराष्ट्र राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. ई-बाईक टॅक्सी आणावी किंवा नाही या करिता राज्य शासनाकडून नेमलेल्या समितीसमोर आमच्या संघटनेमार्फत ई-बाईक टॅक्स टॅक्सीला विरोध करण्यात आला, तसेच त्याचे कारण ही समिती समोर मांडण्यात आले. महाराष्ट्र शासनाने ई-बाईक टॅक्सी या सेवेला परवानगी देणे अगोदर आमच्या संघटने बरोबर चर्चा करणे आवश्यक होते, परंतु महाराष्ट्र राज्य शासनाने एकतर्फी निर्णय घेत ई-बाईक टॅक्सीला परवानगी दिली. ई-बाईक टॅक्सी / बाईक पुलींग सुरू झाल्यास महाराष्ट्रातील 15 लाख रिक्षाचालकांचा रोजगार धोक्यात येणार आहे. असेही संघटनेमार्फत सांगण्यात आले आहे.

Advertisement

राज्य शासनाच्या या अन्यायकारक निर्णया विरोधात दि. २१ मे २०२५ रोजी महाराष्ट्रातील सर्व RTO कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात असुन दरम्यान या निर्णयाचा फटका सर्वसामान्य प्रवाश्यांना बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे प्रशासन या बाबत नेमकं काय पाऊले उचलतं हे ही पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

 

<

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!