क्राईम

पतीने कैचीने वार करून पत्नीची केली निर्घुण हत्या : व्हिडिओ बनवला ; स्वतःच पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला


पुणे :  23 जानेवारी 2025 (बुधवार) पुणे शहर पुन्हा एकदा एका क्रूर हत्येच्या घटनेने हादरले आहे. बुधवारी पहाटे पुण्यातील खराडी परिसरात पती- पत्नीच्या कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीचा शिलाई मशिन कैचीने गळा चिरून हत्या  केली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पतीने हत्या केल्यानंतर  रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा व्हिडिओ बनवून आपण हत्या का केली ते सांगितले. त्यानंतर तो स्वतःहून चंदननगर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपीचे नाव शिवदास गिते असुन तो मूळचा बीड मधील असुन सध्या तो खराडीच्या तुळजाभवानीनगर भागात भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होता. तसेच तो न्यायालयात टंकलेखक म्हणून काम पाहत आहे, गेल्या काही दिवसांपासून गिते दाम्पत्यात कौटुंबिक कारणांवरून वाद व्हायचे. पत्नी ज्योती आणि पती शिवदास यांच्यात बुधवारी पहाटेही असेच वाद झाले.त्यानंतर शिवदासने घरातील कैचीने ज्योतीच्या गळ्यावर वार केले.

मुलाच्या समोरच पत्नीची हत्या केली घरातील आरडाओरडा केलेला आवाजामुळे शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. तसेच पोलिसांना कळवण्यात आले तत्परता दाखवत खराडी पोलिसांनी हजरी लावली व ज्योतीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तिचा शरीरातील रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!