PMPMLबस सुसाट ! बसची गाईच्या कळपाला धडक ; 4 गाईचा मृत्यु, 9 जखमी
कोंढाणपुर : दि. 10 जानेवारी 2025 शुक्रवार रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गाईची धार काढून गोठ्यातुन शेताकडे चरावयास निघालेल्या लहान-मोठया एकुण 18 गाईंच्या कळपास कोंढणपुरहुन पुण्याकडे PMPML बस क्र. MH 12 RN 6069 या बस चालकाने भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने गाईच्या कळपास जोरदार धडक दिल्याने कळपातील 4 गाईंचा जागीच मृत्यु झाला असुन 9 गाई गंभीर जखमी झाल्या आहेत.
कोंढणपूर-शिवापूर-पुणे या रस्त्यावर अपघात झालेल्या ठिकाणी रस्त्यावर गाईचे रक्ताच रक्त सांडलेले व 4 मृत्युमुखी पाडलेल्या गाई तसेच 9 गंभीर जखमी झालेल्या गाई रस्त्यावरती पडलेल्या दिसत होत्या, अपघातामध्ये अजय मुजुमले नावाच्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून PMPML प्रशासन संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणार का ? हा खरा प्रश्न उपस्थित लोकांना पडला आहे.
शिवापुर पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच महसुल विभागाचे अधिकारी तलाठी,सर्कल यांनी तातडीने भेट देऊन अपघात स्थळाची पाहणी केली असुन शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानीबाबत पंचनामा करणार असुन पोलिसांनी PMPML बस चालकाला अटक केली आहे.




