ताज्या घडामोडी

निगडी सेक्टर २२ च्या सोसायटीत दीर्घकाळाच्या वीजसमस्येचे एका दिवसात निराकरण ! आवाज मित्र मंडळ ट्रस्टकडून सुलभा उबाळेंचे आभार


संतोष आडसुळ,
उपसंपादक.

निगडी : निगडी सेक्टर क्र. २२, बिल्डिंग क्र. १५, अंकुश आनंद हौसिंग सोसायटीत गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू असलेल्या वीज पुरवठ्याच्या गंभीर समस्येचे अखेर कायमस्वरूपी निराकरण करण्यात आले आहे. या उल्लेखनीय कामगिरीसाठी आवाज मित्र मंडळ ट्रस्टने माजी नगरसेविका व शिवसेना नेते सुलभा रामभाऊ उबाळे यांचे जाहीर आभार मानले आहेत.

Advertisement

सेक्टर २२ मधील या सोसायटीत वारंवार वीज खंडित होत होती. दर चार-पाच दिवसांनी एमएसईडीसीएलची जोडणी तुटत असल्याने नागरिकांना सतत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. सोसायटी धारकांनी अनेकदा संबंधित कार्यालये व लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला असता दीर्घकाळ समाधानकारक तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे आवाज मित्र मंडळ ट्रस्टच्या सदस्यांनी ही समस्या शिवसेना नेत्या सुलभा उबाळे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तात्काळ लक्ष घालून संबंधित यंत्रणेशी समन्वय साधला व अवघ्या एका दिवसात काम पूर्ण करून घेतले.

परिणामी दीर्घप्रलंबित वीजपुरवठ्याची समस्या मिटली आहे.या तत्परतेसाठी ट्रस्ट व सोसायटीधारकांच्या वतीने सुलभा उबाळे यांचे मनःपूर्वक आभार मानले. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी असा हस्तक्षेप करून दिलासा दिल्याबद्दल परिसरातील सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!