उंबरे गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी ! मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक ऐक्याचा संदेश
उंबरे गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी; मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक ऐक्याचा संदेश
उपहेडलाईन :
नसरापूर : उंबरे (ता. भोर) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उंबरे गावात भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोर-राजगड-मुळशी मतदारसंघाचे आमदार संग्रामदादा थोपटे होते. यावेळी पंचायत समिती सदस्य रोहनदादा बाठे, भीम आर्मी भोर विधानसभा अध्यक्ष महेंद्र साळुंखे, कामथडीचे आदर्श सरपंच धनंजयदादा इंगूलकर, उंबरे ग्रामपंचायत सदस्य रामचंद्रदादा खुटवड, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विशाल आपा डिंबले, आरपीआय पुणे जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष प्रवीणभाऊ ओव्हाळ, युवा नेते सुयेश तात्या गायकवाड, खोपीचे आदर्श सरपंच तुषारदादा कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वक्त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजप्रबोधन आणि सामाजिक समतेसाठीच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्सव प्रमुख आनंद खुडे, अध्यक्ष आदित्य खुडे, उपाध्यक्ष प्रतीक खुडे, सचिव संजय खुडे, कार्याध्यक्ष किरण खुडे व उपसचिव प्रसाद कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमामुळे उंबरे गावात सामाजिक एकात्मता आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.




