सामाजिक

गंगा पुजनाच्या निमित्त महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन.


वर्वे : दि. 15/06/2024 (शनिवार) शिवनेरी मंगल कार्यालय वर्वे, ता.भोर,जि.पुणे. याठिकाणी काशीहून परतलेल्या महिला भाविकांचे गंगापुजन व न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी आयोजित केला होता.

महिला भगिनीचे मनोरंजन व्हावे आणि त्यांच्या रोजच्या नित्यक्रमातुन थोडा वेळ काढुन सर्वांनी एकत्र येऊन एक मोठा सामुहिक मनोरंजनात्मक सोहळा साजरा करावा असा उद्देश होता.

याचबरोबर महिलांसाठी भरपुर बक्षिसे देखील ठेवण्यात आली होती, यामध्ये प्रामुख्याने LED टिव्ही, फ्रिज,पिठगिरण,शिलाई मशीन, पैठणी अशा बक्षीसाचा समावेश होता.

या कार्यक्रमात हजारोच्या संख्येनी महिला भगिनी उपस्थिती होत्या, महिला भगिनींच्या अडीअडचणीत हक्काचं व्यासपीठ ठरलेल्या कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद घेतला.

तत्पूर्वी किरण दगडे पाटील यांनी काशी यात्रा घडविलेल्या नागरिकांच्या उपस्थितीत सामूहिक गंगापुजन कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने पार पाडला.

Advertisement

यावेळी प्रथम क्रमांक सौ.पूनम सुरज मिसाळ रा. वर्वे बु.ता.भोर, द्वितीय क्रमांक सौ. वैशाली संजय फाटक रा. पानवळ,ता.भोर, तृतीय क्रमांक सौ.संगीता श्रीकांत कुरुडकर रा. वर्वे खु. ता. भोर, चतुर्थ क्रमांक सौ.अंकिता श्रीकांत भोरडे रा.वर्वे खु. ता. भोर या भगिनी मोठ्या बक्षीसांच्या मानकरी ठरल्या.                         या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिला भगिनीला देखील उत्तेजनार्थ आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या.

अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर आणि बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांनी उत्कृष्ट सादरीकरणातून प्रेक्षकांची मने जिंकली.

याप्रसंगी  राज्यसभा खासदार सौ. मेधाताई कुलकर्णी, भाजपा भोर तालुका अध्यक्ष जीवनआप्पा कोंडे ,वेल्हे तालुका अध्यक्ष आनंद देशमाने,जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गरुड, जिल्हाउपाध्यक्ष विनायकजी ठोंबरे, भोर शहर अध्यक्ष सचिन कन्हेरकर, विनोद चौधरी, महिला अध्यक्ष सौ.आशाताई शिवतरे, सौ.विजया कोंडे युवा मोर्चा अध्यक्ष भोर अमर बुदगुडे, युवा मोर्चा अध्यक्ष वेल्हे मेघराज हनमघर ,राजेंद्र मोरे तसेच किरणदादा दगडे पाटील युवा मंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!