किकवी गावच्या उपसरपंचपदी सौ वंदना रामदास अहिरेची बिनविरोध निवड
कापूरहोळ: भोर तालुक्यातील महामार्ग लगत असलेल्या किकवी ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ.वंदना रामदास अहिरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करताच त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत एकमेकांना पेढे भरवत आपला आनंद व्यक्त केला.
किकवी ग्रामपंचायतीच्या मावळत्या उपसरपंच परवीन मौलादीन शेख यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच निवडणुक झाली या पदा करिता वंदना रामदास अहीरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यावेळी निवडणूक प्रक्रिया युवा सरपंच नवनाथ सयाजी कदम व ते ग्रामसेवक विजय गेजगे यांच्या देखरेखीखाली पार पडली.
यावेळी किकवी ग्रामपंचायत सदस्य परवीन शेख,भास्करराव सपकाळ, संजय राऊत, दिपाली काकडे, अमित निगडे, माजी सरपंच नवनाथ भिलारे, चेअरमन दत्तात्रय भिलारे, माजी सरपंच अर्जुन अहिरे, तंटामुक्ती अध्यक्ष किरण घारे, कामगार नेते नारायण भिलारे ,मौलादीन शेख,नरेंद्र मोदी, रामदास अहिरे, चेतन कोंढाळकर, भरत अहिरे,राहुल अहिरे, प्रशांत कोंढाळकर, सुनील अहिरे, प्रफुल्ल अहिरे,राजेंद्र निगडे, उमेश अहिरे ,गणेश भिलारे, दामोदर अहिरे, बबन अहिरे, आणि किकवी ग्रामस्थ, महिला उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी नवनिर्वाचित उपसरपंच यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निर्वाचित उपसरपंच वंदना रामदास अहिरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले की सहकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, तसेच उपसरपंच पद देऊन मला गावाची सेवा करण्याची जी संधी दिलीय त्याबद्दल मी विद्यमान सरपंच, सदस्य व ग्रामस्थांचे आभारी आहे.




