क्राईम

कासुर्डी गावात खिडकीतून घरात प्रवेश करून ८० हजारांची चोरी ; राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


खेड शिवापूर : भोर तालुक्यातील कासूर्डी खे.बा. गावातील एका तरुणाच्या घरातून चांदीचे दागिने आणि रोकड असा ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की पुरुषोत्तम रोहिदास लाड (वय- ३४) रा. कासुर्डी खे.बा. ता. भोर, जि. पुणे हा तरुण आपल्या परिवारासह याठिकाणी वास्तव्याला आहे. मोलमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. १४ जुलै २०२५ रोजी दुपारी १:४५ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान त्याचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या खिडकीतून घरात प्रवेश करून चांदीच्या दागिन्यांसह (चांदीचे पैजण,वाळे, कंबरेची साखळी) एकूण १०,००० रुपयाचे व रोख रक्कम ७०,००० रूपये असा एकूण ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यानी राजगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार बर्काले करत आहेत.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!