कापूरहोळ येथील सार्वजनिक अंडरपासमध्ये साचलेले पाणी, दुर्गंधी,कचरा व बंद पडलेल्या लाईटमुळे ग्रामस्थांना नाहक त्रास
कापूरहोळ : कापूरहोळ येथील साईस्पर्श बिल्डिंग समोरील सार्वजनिक अंडरपास मध्ये साचलेले पाणी, दुर्गंधी आणि वारंवार बंद पडणाऱ्या लाईटमुळे शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना हाल सोसावे लागत आहेत. महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर माती साचत असल्याने अडचणी वाढू लागल्या आहेत. भोर तालुका युवा सेना मा.अध्यक्ष अमित गाडे यांनी पुणे-सातारा महामार्ग प्रशासनाला 5 दिवसांत उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
रोज या अंडरपासमधुन शेकडो लोक ये-जा करत असतात, तसेच दुचाकी व तीन चाकी वाहने ही सरास जात-येत असतात ज्येष्ठ ग्रामस्थ, शेतकरी, गुरे-ढोरे शेतशिवाराकरिता जात असतात, अंडरपासमध्ये पाणी साचल्यामुळे आतापर्यंत लहान मुले व वृद्ध व्यक्ती पडल्याल्या असुन याबाबत वारंवार तक्रार करुन देखील पुणे-सातारा महामार्ग प्रशासन दखल घेत नसल्याने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.




