शिक्षण

ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल 100% — गुणवंत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश !


किकवी : ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूल किकवी, तालुका भोर, जिल्हा पुणे येथील इयत्ता दहावीच्या CBSE बोर्ड परीक्षेत यंदा पहिल्याच वर्षीच्या बॅचने 100% निकालासह उल्लेखनीय यश मिळवले आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची पुष्टी केली. या बॅचमधील प्रणिता चव्हाण हिने 90.40% गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला, तर प्राप्ती शिंदे हिने 88.60% गुणांसह द्वितीय आणि दिव्या सरगर हिने 83.80% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.

Advertisement

या यशस्वी निकालाबद्दल संस्थाचालक कर्नल यशवंत रेणुसे, प्राचार्य उमेश सोनवले, शिक्षिका जान्हवी सोनवले, शिक्षकवृंद आणि पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. प्राचार्य उमेश सोनवले सर यांनी विद्यार्थ्यांचे हे यश त्यांच्या मेहनतीचे आणि शिक्षकांच्या समर्पित मार्गदर्शनाचे फळ असून शाळेच्या शंभर टक्के निकालाची अपेक्षा पूर्ण केल्याबद्दल आम्हाला विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान असल्याचे म्हटले आहे. तर जान्हवी सोनवले मॅम यांनी या यशाचे श्रेय शाळेच्या शिक्षणपद्धती आणि पालकांच्या पाठिंब्याला दिले आहे. प्रणिता चव्हाण या विद्यार्थिनीने शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नियमित अभ्यास यामुळे हे यश शक्य झाले असल्याचे म्हटले.

संस्थाचालक रेणुसे कुटुंबीयांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या निकालाने ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाची प्रचिती आली आहे. शाळेच्या शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!