क्राईम

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक : दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू


कापूरहोळ : पुणे- बेंगलोर महामार्गावरील निगडे गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात रात्री 12:30 ते 1:00 च्या दरम्यान झाला असुन यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. धडक देणारा वाहनचालक घटनेनंतर वाहन घेऊन पसार झाला आहे.

Advertisement

किरण हिरालाल पुणेकर (वय ४७) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पुणेकर हे भाजी विकण्यासाठी नारायणपूर गेले होते ते रात्री भाजी विकून रात्री 12:30 ते 1:00 च्या दरम्यान दुचाकी नं. MH 11 DU 2227 या गाडीवरून वाटाणा घेवडा अशा भाजी पाल्याची पोती घेऊन येत असताना पुणे-बेंगलोर हायवेवरील निगडे गावच्या हद्दीत राजगड साखर कारखान्याच्या पुलाच्या उताराला अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात पुणेकर हे जागीच ठार झाले असून या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस अधिकारी नाना मदने करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!