क्राईम

निगडे गावात शेतामधील झाडाची फांदी तोडण्याहून एकास मारहाण


 

कापूरहोळ : दि. २३ जुलै २०२५ (बुधवार) रोजी मौजे निगडे, ता.भोर जि.पुणे येथे शेतामधील झाडाची फांदी तोडुन झालेल्या वादावादीत एका शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत रामचंद्र प्रल्हाद मालुसरे (वय ५५ वर्ष ) यांनी राजगड पोलिस ठाण्यात तानाजी दिनकर मालुसरे यांच्या विरुध्द फिर्याद दिली आहे.
आरोपी यांनी घरात शिरून फिर्यादीच्या पत्नीस तुझ्या नवऱ्याने लिंबाच्या फांद्या तोडल्यामुळे माझ्या घेवडा पिकाचे नुकसान झाले आहे, या कारण देत रामचंद्र मालुसरे यांना शिवीगाळ करत त्यांनी आणलेला कळकाचा बांबूने डोक्यात व पायावर मारहाण केली.
यावेळी रामचंद्र मालुसरे यांची मुलगी रेश्मा मांढरे ही बचावासाठी पुढे आली असता, तिलाही धक्का देऊन जमिनीवर पाडण्यात आले. तसेच तिच्या तोंडावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत दमदाटी केली, याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजगड पोलिस करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!