सरपंच नवनाथ कदम यांच्या कार्यकाळात किकवी ग्रामपंचायतीस सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार
अरविंद भोसले, भोर,प्रतिनिधी.
किकवी : भोर तालुक्यातील पुणे – बेंगलोर हायवेला किकवी ग्रामपंचायत असुन त्यांनी पंतप्रधान आवास योजना आपल्या गावात यशस्वी पणे राबवून सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून भोर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ग्रामपंचायत म्हणून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण अमृत महाअवास अभियान पुरस्कार 2022- 2023 राज्य पुरस्कृत पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) तालुकास्तरीय सर्वात्कृष्ट ग्रामपंचायत किकवी ता.भोर, जि. पुणे यांस अमृत महाआवास अभियान पुरस्कार 2 अंतर्गत विविध उपक्रमाच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत या प्रकारात प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह संग्राम थोपटे आमदार भोर, राजगड (वेल्हा), मुळशी. यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी मा.गटविकास अधिकारी किरण कुमार धनवडे, भोर प्रांताधिकारी कचरे, भोर तहसीलदार पाटील, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी घोगरे तसेच इतर शासकीय अधिकारी वर्ग या सर्वाःच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारताना किकवी गावचे ग्रामसेवक विजय गेजग, सरपंच नवनाथकदम, ग्रामस्थ तानाजी अहिरे यांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारण्यात आला. किकवी ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजना गावात यशस्वीपणे राबवून सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, विद्यमान सदस्य या सर्वांचे विविध स्तरातून आभार व अभिनंदन करण्यात येत आहे.




