ताज्या घडामोडी

वरवे गावावर शोककळा ! भरधाव टेम्पोच्या धडकेत जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू !! चार दिवस मृत्यूशी झुंज अपयशी !!! फरार टेम्पो चालकाविरुद्ध राजगड पोलिसांचा तपास सुरू


कापूरहोळ : भोर तालुक्यातील वरवे फाटा परिसरात पुणे–सातारा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दयानंद हरीशचंद्र बांदल (वय ४२, रा. वरवे, ता. भोर) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून गुरुवारी (दि. ४) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे वरवे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दयानंद बांदल हे ३० ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी वरवे फाटा येथे पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एमएच १२ एनएक्स ७९४३ क्रमांकाच्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, बांदल यांच्या डोक्याला, कपाळाला, पोटाला तसेच शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापती झाल्या.

Advertisement

अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याप्रकरणी नवनाथ ज्ञानेश्वर वाल्हेकर यांच्या फिर्यादीवरून राजगड पोलिस ठाण्यात टेम्पो चालक महेंद्र इंगळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!