महाराष्ट्र कारागृह अधिकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी भोर तालुक्याचे सुपुत्र मनोज गायकवाड यांची बिनविरोध निवड
पुणे : महाराष्ट्र कारागृह पोलिस अधिकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या दिनांक २८/०८/२०२५ (गुरुवार) रोजी चेअरमन पदाची निवडणुक झाली यावेळी भोर तालुक्यातील संगमनेर गावचे सुपुत्र मनोज हनुमंत गायकवाड यांची संस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र कारागृह पोलिस अधिकारी कर्मचारी सहकारी संस्थेची नुकतीच ३ महिन्यापुर्वी निवडणूक झाली होती यामध्ये स्वराज्य पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून आले होते. त्यावेळी दि. १६ जून २०२५ रोजी संस्थेच्या चेअरमन पदी वसीम इनामदार यांची निवड करण्यात आली होती परंतु येरवडा जेलचे जबाबदार पद त्यांच्याकडे असल्याने तसेच वरिष्ठ तुरुंगाधिकारी म्हणून काम पाहताना पतसंस्थेला वेळ देणे त्यांना शक्य होत नसल्याने त्यांनी स्वखुशीने उपनिबंधक पुणे शहर यांचेकडे चेअरमन पदाचा राजीनामा दिला होता.
संस्थेचे चेअरमन पद हे रिक्त झाल्याने निवडणुक घ्यावी लागली असल्याने संचालक मंडळाने संस्थेचे सचिवपदावर केलेल्या कामाची दखल घेत मनोज हनुमंत गायकवाड यांना चेअरमन पदी बिनविरोध द्यायचे ठरवले त्यानुसार चेअरमन पदाच्या निवडणुक प्रक्रीयेत गायकवाड यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक अधिकारी अजय पतंगे जाहिर केले.
निवडणुक प्रक्रिये वेळेस संस्थेचे व्हा.चेअरमन अतुल पटेकर , सह सचिव योगेश पाटील व संचालक प्रमोद जानराव, प्रमोद इंगळे, साहेबराव वाळकुळे ,भरत बंडगर, दौलत खिलारे , प्रणाली कोकाटे, लिला धुमाळ तसेच संस्थेच्या लिपीक प्रिया शिर्के, स्वाती बडेकर उपस्थित होते.
महाराष्ट्र कारागृह पोलिस अधिकारी कर्मचारी सहकारी माध्यमातून संस्थेचा विकास साधने तसेच नवनवीन आर्थिक उपक्रम राबवण्यात येणार असुन सर्वांना सोबत घेऊन कार्यरत राहू असे नवनिर्वाचित चेअरमन मनोज गायकवाड यांनी सांगितले.
नवनिर्वाचित चेअरमन पदी निवड झाल्याने मनोज गायकवाड यांच्यावर महाराष्ट्राच्या सर्वच कारागृह पोलिस अधिकारी व कर्मचारी, कौटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
.




