ताज्या घडामोडी

भोंगवली पंचायत समिती गणातील भाजपाचे उमेदवार रोहन बाठे यांचा होम टू होम प्रचारावर भर ! गावागावातून मतदारांचा मोठा प्रतिसाद


सारोळा : भोर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे राजकीय वातावरण प्रचार दौरे आणि घोंगडी बैठकांनी ढवळून निघाले आहे. भोंगवली पंचायत समिती गणात भाजपचे उमेदवार रोहन बाठे यांनी होम टू होम प्रचारावर अधिक भर दिला असून मतदारांच्या गाठीभेटी घेत ते मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यांच्या या होम टू होम प्रचाराला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

भाजपचे उमेदवार माजी उपसभापती रोहन बाठे यांनी केलेल्या मागील विकास कामांचा लेखाजोखा मांडत मतदारांसमोर जात आहेत. कोरोना कालावधीत त्यानी केलेल्या आरोग्य सेवांची मतदारांना जाणीव असल्याने मतदाराकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Advertisement

रोहन बाठे यांच्यासोबत भाजपची मोठी फळी आहे. त्यांनी भोंगवली गणातील व परिसरातील वाड्या वस्त्या, गावांमध्ये होम टू होम प्रचार सुरू केला आहे. कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत ते पोहोचत आहेत. मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि ते पूर्ण करण्याचं ते ठाम आश्वासन ही देत आहेत.

माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या झालेल्या विकास कामाचं मोठं पाठबळ असल्याने त्यांच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाल्याचे चित्र भोंगवली गणात पाहायला मिळत आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!